श्यामची आई a very beautiful inspiring story must read

श्यामची आई*
श्यामच्या आईचे कुटुंब गरिबीतून वाटचाल करीत असताना दिवाळीसाठी भाऊबीज म्हणून यशोदाबाईंना त्यांचा भाऊ पैसे पाठवतो. ती स्वत:ला साडी न घेता श्यामकडून वडिलांसाठी धोतर आणवते. नरकचतुर्दशीला अभ्यंगस्नान झाल्यावर वडील त्यांचे फाटके धोतर शोधू लागतात. तेव्हा श्यामची आई म्हणते मी त्या धोतराचे पायपुसणे केले. वडील चिडून म्हणतात की “अगं,आता मी काय घालू ? ”तेव्हा ‘श्यामची आई’ कुंकू लावून ते धोतर हातात देवून चकित करते. श्यामचे वडील तिला म्हणतात, अगं, भाऊबीजेच्या पैशावर तुझा हक्क आहे आणि तुझीही साडी फाटलेली आहे..."
यावर श्यामची अाई म्हणते “हो. पण तुम्हाला बाहेर जावे लागते ना ?”
हा छोटासाच प्रसंग पण मुलांना त्यातून नात्यात एकमेकांसाठी काय करायचे असते याचे भान येते. हे अभावातले आनंद श्यामची अाई मुलांना नकळत शिकवते. श्याम चा धाकटा भाऊ पुरुषोत्तम शाळेत जाताना कोट हवा म्हणून हट्ट धरतो.गरिबीमुळे तो घेणे शक्य नसते. तेव्हा श्याम खाऊच्या वाचलेल्या पैशातून पुरुषोत्तम ला कोट शिऊन आणतो.नकळत आईने केलेल्या संस्काराचा परिणाम श्यामवर होतो. गरिबीत हे नातेसंबंध उजळून निघतात.त्यातून वस्तूंचे मूल्य अधिक योग्य रितीने पटते.
आज आपल्या घरात मुलांसाठी पालक म्हणजे कल्पवृक्ष किंवा अल्लाउद्दीनचा दिवा झाले आहेत. कोणताही शब्द उच्चारला की ती वस्तु लगेच समोर हजर होते.त्यातून मुलांच्या संवेदना निबर होत आहेत. श्यामच्या घरात धोतर आणि कोट ज्याप्रमाणात नातेसंबंध अधिक बळकट करते ते आज होत नाही. त्यातून वस्तूंविषयी पण एक बेफिकीरपणा मुलामध्ये निर्माण होतो आहे. साधे उदाहरण पेनचे घेता येईल.आपल्या लहानपणी किमान २ ते ३ वर्षे एक पेन आपण वापरत असायचो पण आज एका महिन्यात २ ते ३ पेन मुलांचे होतात. एखादी वस्तु बिघडली की ती दुरुस्त करणे हा प्रकार संपला ती फेकून लगेच दुसरी वस्तु मुलांना हवी असते.अर्थात हा पालक संस्कार आहे. घरातली कोणतीही वस्तु बिघडली की दुरुस्त न करता लगेच दुसरी वस्तु आणली जाते. मुलेही त्याचे अनुकरण करतात.लहानपणी आपण वर्ष संपले की जुन्या वह्यातील कोरी पाने फाडून नव्या वह्या तयार करायचो. आज वर्ष संपले की त्या वह्या फेकल्या जातात. कपडे थोडे वापरले जाताच फेकले जातात.। श्यामची आई अभावातले आनंद शिकवते। येत्या 2 नोव्हेंबर ला श्यामच्या आईच्या मृत्यूला १०० वर्षे पूर्ण होत आहेत। अाजही तिने दिलेला संस्कारांचा तितकाच ताजा अाणि अपरिहार्य वाटतो.

Post a Comment

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();