step by step tomato souce procedure

टोमॅटो सॉस (केचप)साहित्य : दोन किलो टोमॅटो,एक मोठा कांदा,एक लसणाचा गड्डा ,आल्याचा एक मोठा तुकडा,पाव किलो साखर,एक टेबलस्पून लाल मिर्च्यांचे तिखट,एक चमचा गरम मसाला,एक चमचा एसिटिक एसिड,एक चमचा सोडियम बैंझाइट ( प्रिझर्वेटिव्ह)
कृती : सॉस बनवण्यासाठी पातळ सालीचे पूर्ण पिकलेले पण टणक असलेले लाल बुंद टोमॅटो हवेत. टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यावेत व चिरून त्यांच्या फोडी करून ठेवा.
कांदा,लसूण व आले मिक्सरच्या ग्राइंडर मध्ये फिरवून घेऊन त्यांची पेस्ट बनवा.
टोमॅटोच्या चिरलेल्या फोडी व मिक्सरवर वाटून घेतलेली कांदा-लसूण व आल्याची पेस्ट त्यात घालून ते पातेले गॅसवर ठेवून टोमॅटो नरम होईपर्यंत शिजवा. शिजून टोमटोला पाणी सुटायला लागेल त्यामुळे वेगळे पानी घालायची जरूरी होणार नाही,अगदी आवश्यक असेल तरच थोडेसे पाणी घाला.
शिजलेले टोमॅटो पुरण यंत्रातून गाळून त्यांची प्यूरी बनवून घ्या. ही प्यूरी नंतर मिक्सरच्या ग्राइंडरमधून वाटून एकसंघ बनवून घ्या.
आता या टोमॅटो प्यूरीत साखर घालून एकीकडे चमच्याने एकसारखे ढवळत राहून प्यूरी शिजावून एक तृतीयांश होईपर्यंत आटवा. एका बशीत चमचाभर प्यूरी काढून बशी थोडी तिरकी करा,जर प्यूरितून पाणी बाहेर आले तर प्यूरी अजून थोडी आटवा,जर प्युरीतून पाणी बाहेर आले नाही तर समझा की सॉस तयार झाले आहे. आता त्यात उरलेली साखर,मीठ,लाल तिखट,गरम मसाला घालून ४-५ मिनिटे शिजवून घेऊन गॅस बब्द करा.
एका वाटीत थोडेसे सॉस काढून घेऊन त्यात एसिटिक एसिड व सोडियम बैंझाइट मिक्स करा व हे सॉस मग उर्वरित सॉसमध्ये घालून चणले एकजीव होईल असे मिक्स करा व ताबडतोम बाटलीत भरून सील करा.
या टोमॅटो सॉस मध्ये कांदा,लसूण,आले,लाल तिखट आणि गरम मसाला यांचे प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार ठरवावे.

Post a Comment

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();