Secret Superstar : Story And Review By Bhagyashree Bhadiwar

सीक्रेट सूपरस्टार ---- new hindi movie review

एक सर्वसामान्य घरातली मुलगी आपले ध्येय , स्वप्न कसे पूर्ण करते, तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला काय काय दिव्यातून जावे लागते. मनात सतत आशा ठेवून जगणारी एक 14-15 वर्षाची शाळेत जाणारी मुलगी , त्याभोवती फिरणारी कथा म्हणजे सीक्रेट सूपरस्टार.
खरच आजच्या पालकांनी , आणि मुलांनी बघावा आणि यातून बोध घेण्यासारखे खूप काही आहे.
बालमनाचे विविध कंगोरे यात उलगडून दाखवले आहे. कसलेहीं पाठबळ नसताना आपले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी काय काय शक्कल लढवते, ते पडद्यावर प्रत्येकानी बघायला हवेच.
कथा सुरू होते ,
गुजरातमधील एक छोट शहर वडोदरा , तिथे राहणारे एक कर्मठ मुस्लिम कुटुंब. त्या कुटुंबात राहणारी 14-15 वर्षाची शाळकरी मुलगी .
आजी , आई- वडील, आणि छोटा भाऊ अस छोटेखानी कर्मठ कुटुंब. जिथे स्त्रीयांना आपले गुलाम समजतात अशा या जुन्याट विचारांच्या घरात जन्माला आलेली हीं मुलगी इँशा .
इँशा वयाच्या 6 वर्षापासून ती गिटार शिकत असते, ते तिच्या अम्मीने तिची आवड ओळखून आपल्या नवर्याकडून कशीबशी पेर्मिशन काढून आपल्या मुलीला त्या क्लासमध्ये घातलेले .
ती त्यातच पारंगत होऊन हळूहळू ती स्वतः गायलाहीं लागते. कविता लिहून गायलाहीं लागते. ती गायिका मोनालि ठाकुरची फॅन असते, तिच्यासारखे आपण फेमस सिँगर व्हायचे हे स्वप्न असते .इतकी तिची प्रतिभा असूनही तिला पुढे जायला वाव नसतो, त्याला कारण म्हणजे वडिलांचा याला विरोध.
आजही काही काही घरात म्हणा किंवा धर्मात म्हणा, मुलींना हीन समजले जाते, तिच्या ईच्छ्- आकांक्षाना महत्व दिले जात नही, तिच्याभावनेचा आदर केली जात नाही,
बायको म्हणजे पायाखालची वहाण समजून , गुलाम समजून वाटेल तेव्हा मारणे,तिचा छळ करणे. हे सुरूच आहे.
याचे चित्रण पण या सिनेमात केले आहे.
इँशाचे वडील शिकले सव्र्लेले असून कर्मठ मुस्लिम असतात, आणि तिच्या आईचा सतत छळ, वाटेल तेव्हा तमाशा करणे हे रोजच ठरलेले असली तरीही त्यातून काय मार्ग काढता येईल याचा सतत विचार करणारी , आपले स्वप्नपूर्तिसाठी झटनारी मुलगी म्हणजे इँशा.
या मुलीने आपल्या कलाकौशल्याने हीं भूमिका जिवंतपणे साकारली आहे.
दर वेळी निराश होणे , भावनाचे हिँदोळें अतिशय उत्कृष्टपणे सादर केले आहेत. बाकी कलाकारानी पण आपल्या भूमिका चोखपणे पार पाडल्या आहेत. आमिर खानची यात छोटी भूमिका असली तरीही तोही भाव खाऊन गेला आहे. अतिशय वेगळी भूमिका माणूस चांगल वाईट कस असतो याच जिवंत चित्रण आहे .
तर या अशा कर्मठ घरातली मुलगी स्वप्न कायम उराशी बाळगुण जगत असते, आपल्या साध्यासुध्या आईला जगण्याच महत्व पटवून देत असते. रोज दिवस आणि रात्र सुरू असते . आपण रोज उठतो आणि झोपतो . पण तुमच्या अशा जगण्याला काही अर्थ नसतो. पण या सोबतच तुमचे स्वप्न , आशा मनात ठेवून जर त्याद्रुष्टीने वाटचाल करत राहिले तरच तुमच्या जीवन जगण्याला खरा अर्थ प्राप्त होतो .
यालाच जीवन ऐसे नाव 😊
हे आपल्या आईला हीं मुलगी सांगत असते.
माणसाने कायम आशादायीं असावे.
असेच एके दिवशी तीच स्कूल मित्रने तिला एका वेगवेगळे स्पर्धाचे माहिती असलेले एक पत्रक तिच्या हातात देतो ,त्यात बक्षीस म्हणून एक लेपटॉप आणि इंटरनेट कनेक्षन अस असते .ती खुश होऊन कामाला लगते आणि ती गाण्याच्या स्पर्धेत भाग घेण्याचे ठरवते आणि एक गाण स्वतः लिहायला लगते . वडीलांची परवानगी ती मागायला जाते तिच्या हाती निराशा येते आणि हताश होते.
हा प्रसंग बघत असताना प्रेक्षकाचे मन हेलावून जाते, बघताना आपल्याला हीं अस्वस्थ वाटत राहते.त्यानंतर
तिच्या आईला एक आयडीया येते आणि ती कुठून तरी पैसे जमवून मुलीला लेपटॉप घेऊन देते. आणि इंटरनेटची भूलभूलैय्या बघून आपण हीं आपली कला सादर करून जगाला दाखवावी असे वाटते, पण तिच्या वडिलांना हे असला कही आवडत नाही म्हणून तिल काय कराव सुचत नही आणि अशाटच तिची आई तिला तुला वडिलांनी ओळखू नये म्हणून बूर्खा घालून गाण म्हणून vidio you tube वर तू टाकू शकते असे सांगते .
इँशा त्या कामाला लागते, बूर्खा घालून लेपटॉप समोर गावुन आपला vidio बनवून ती you tube वर सीक्रेट सूपरस्टार या नावाने आपले vidio टाकते आणि हळूहळू सारे जग तीच गाण्याचे , आवाजाचे चाहते होऊ लागतात. tv वर , न्यूसपेपरवर तिच्या बातम्या येऊ लागतात .
यातच शक्ति कुमार बनलेला अमीर खान तिच्या vidio ची दखल घेऊन तिची तारीफ करतो आणि तिला एक बॉलीवुड गाण्याची ऑफर देतो. शक्ति कुमार हा एक बॉलीवुड मध्ये नावाजलेला नेगेटिव कॅरॅक्टर असलेला singer असतो अस यात दाखवलेल असते आणि इँशाला त्यांची ऑफर घ्यायची की नाही या विचारात असताना तिचा मित्र तिला चांगले पटवून सांगतो .
चिंतन हा इँशाचा क्लासमेट असतो , त्याला ती मैत्रीण म्हणून खूप आवडत असते. तिला हवी ती हेल्प करण्यासाठी कायम तप्तर असतो.
या सगळ्या गडबडीत दुसरीकडे अचानक इँशाचा वडीलला सौदीला जॉब मिळतो, तर तिकडे शिफ्ट होण्याचा प्लॅन करतात तसेच इँशाचा निकाहसाठी त्यानी मुलगा पण पाहून ठेवला असतो आणि तिकडे गेल्यावर तीच निकाह करायचा ठरवित असतात.
या गोष्टीने नायिका हादरून जाते , झगड़खोर बापापुढे काही चालत नाही म्हणून ती निराश होते आणि त्यातच अशाच एका छोट्या कारणमुळे लेपटॉप कसकाय घेतला ते समजल म्हणून तिल ते फेकून द्यायलाहीं सांगतात.
या सगळ्या घटना एकामागे एक घडत असताना ती तिच्या आईला वडीलला तलाक द्यायला सांगते, पण तिची आई मानत नही .
आणि इँशा निराशेच्या खोल गर्तेत बुडते, पण त्याच बरोबर तिचा मित्र तिला संगतो की, शक्ति कुमारने बॉलीवुडमध्ये तिल सिंगिंगसाठी ऑडीशनसाठी बोलावले आहे असे सांगून तिला स्कूलच्या वेळेत वडोदरा ते मुंबई फ्लाइटची तिकीट काढून देवून मुंबईला जाण्यासाठी मदत करतो , हा प्रसंग खूप छान जमून आलेला आहे .
काही प्रसंग इतके धडकी भरून आणतात की असे वाटते की आपण त्या मानाने किती सुखी जीव असेही वाटून जाते.
नंतर एवढ्या खटपटीतून नायिका मुंबईला जाते आणि शक्ति कुमारकडे ऑडिशन देते तेव्हा आजचा बॉलीवुड धान्गडधिँगा गाण्याची फर्माईश तिला आमिर खान देतो , तेव्हा तिला जमेना , पण ती त्यांचे मन वळवून मनातली गाणी जर बॉडी लँग्वेजमध्ये म्हणण्यापेक्षा ह्रुदयतून जास्त गायली जाईल तर खूप छान होईल हे पटवून देऊन ती मोठ्या जोशात ते गाण म्हणते आणि एका वकीलची गरज आहे सांगून ती त्या शक्ति कुमारची मदत घेऊन आपल्या आईचा छळबद्दल वकील ला सांगते तेव्हा ती वकील तिला एक फाईल देवून तिला तीच काम होईल असे सांगून धीर देते .
पण ती माघारी आल्यावर तिच्या आईला ती तलाकसाठी तयार करते पण तिची आई सहजसहजी होकार देत नही आणि फेमिलीसोबत सौदीला जायची तयारी करायला लागते.
तिला तिच्या आजीकडून तिच्या जन्मचे रहस्य समजते तेव्हा ती हादरून जाते , जिथे मुलीचा जन्म झाल्यावर तिल मारल्या जाते , तिथे तिच्या आईने तिला वडीलपासून कसबस वाचविले असते , हे समजल्यावर इँशा मनातून पार कोसलून जाते आणि पुढे आता अंधार म्हणून नाराज राहते .
असेच एकेदिवशी तीच बॉलीवुड गाण फेमस होते आणि तीच सीक्रेट सूपरस्टार म्हणून नाव होऊ लागते. पण ती एवढ सगळं होऊन त्याचा आनंद घेऊ शकत नसते. कारण म्हणजे सौदीला जायचा दिवस आणि तिला एका अवॉर्ड फंक्शन मध्ये नोमिनेट करायच दिवस अस एकचवेळी होऊन पण ती काही करू शकत नसते , मुंबई airport ला ते येतात , जायची तयारी सुरू होते आणि पुढे काय होते हे सर्वानी चित्रपटात बघायला हव , कारण इथे एक महत्वाचा प्रसंग अधोरेखित केले गेलेला आहे ज्यामुळे सगळे प्रेक्षक मंडळी टाळ्या वाजवू लागतात . आणि सौदीला ते जातात का ? इँशाला अवार्ड मिळतो का? तिची आई काही मार्ग काढते का ?? हे सगळं बघायला तुम्ही थिएटरमध्ये जायला आहे.
आपल अस्तित्व आपण कस जपली पाहिजे हीं शिकवण पण देवून जातो.
बंधने झुगारुन माणूस संकटवर मात करून आपले ध्येय उशीरा का होईना पण साध्य करतो हे दाखवून दिले आहे . गाणी सगळी श्रवणीय आहेत.
नक्की बघा सर्वानी ......😊

Bhagyashri Yangalwar Bandiwar

Comments

Popular posts from this blog

Make Money with 7 Amazon Online Jobs Work from Home

earn in lacs if your passion is writing without investment, work from anywhere