Thursday, 26 October 2017

रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवाल? - how to increase immunity power..

रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवाल?
Maharashtra Times |
डॉ. शिशिर जोशी, फिजिशियन, पुणे
डॉक्टरांनी कितीही औषधं दिली तरी पेशंटमधील उपजत रोग प्रतिकारशक्ती असणं आवश्यक आहे. त्यासाठी काही उपाययोजना आणि पथ्यं पाळणं आवश्यक आहे.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातच बैठं काम आणि जंकफूड, पिझ्झा, बर्गर यासारखे खाद्यपदार्थ खाण्याची आवड. अशात विविध जंतू, विषाणूंचा संसर्ग होऊन आजारी पडण्याचं प्रमाण वाढत आहे. डॉक्टरांनी कितीही औषधं दिली तरी पेशंटमधील उपजत रोग प्रतिकारशक्ती असणं आवश्यक आहे. त्यासाठी काही उपाययोजना आणि पथ्यं पाळणं आवश्यक आहे. नेमकी रोग प्रतिकारशक्ती म्हणजे काय आणि त्यावर होणारा परिणाम तसेच ती कशी निर्माण करता येईल, याचा विचार करू.
शरीरात कोणताही जंतूसंसर्ग, तसेच अॅलर्जी यापासून सरंक्षण करण्याचं काम म्हणजेच प्रतिकारशक्ती. रोग प्रतिकार किंवा विविध गोष्टींमुळे शरीरात होणारी रिअॅक्शन यांना अडवण्याचं काम प्रतिकारशक्ती करीत असते. प्रतिकारशक्तीचे दोन प्रकार असतात. पहिला प्रकार म्हणजे निसर्गतः जन्मतः मिळणारी शक्ती. म्हणजेच शरिरात असणारा बोन मॅरो. हा रक्तातील जंतू कंवा नको असलेल्या पेशी शोधून त्यावर रिअॅक्शन देत असतो.
पहिला प्रकारः
विविध प्रकारचे जंतू किंव जेनेरिक भाग किंवा काही वेळा पूर्वी होऊन गेलेला आजार यामुळे ठराविक प्रतिकार शक्ती तयार होते. यात पुन्हा प्रकार असतात. एक म्हणजे सगळ्या प्रकारचे जंतू विरुद्ध प्रतिकार शक्ती आणि दुसरा ठराविक जंतू विरुद्धची शक्ती.
दुसरा प्रकारः
ठराविक वातावरण, जंतू, अॅलर्जी या सान्निध्यात वारंवार असण्यामुळे शरीरात ठराविक बदल घडून येतात. ज्यानं प्रतिकारशक्ती तयार होते. यामुळे शरिरात त्रास दिसून येत नाही. त्याचेसुद्धा दोन प्रकार आढळून येतात. एक म्हणजे शरीरात आपोआप तयार होणारी शक्ती आणि दुसरी म्हणजे लस, इंजेक्शनमुळे तयार होणारी शक्ती. याच दुसऱ्या प्रकारात मोडणारा प्रकार म्हणजे अॅक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह.
अॅक्टिव्ह म्हणजे जिवंत जंतूपासून तयार केलेली लस शरीरात इंजेक्शनद्वारे दिली जाते. व शरीरात त्यावर बदल होऊन त्या त्या आजाराची प्रतिकारशक्ती तयार होते. पॉझिटिव्ह म्हणजे प्रतिकारशक्ती तयार अन्टीबॉडीज वापरणं.

जंतूसंसर्ग झाल्यानंतर बोन मॅरोचं निदान करून त्यावर प्रतिकार करण्याच्या पेशीचं प्रमाण वाढवितो. (उदा. पांढऱ्या पेशी) किंवा शरीरात होणारी रिअॅक्शन म्हणजेच ताप, अंगदुखी, थंडी वाजून येणं म्हणजे जंतूमधील विषारी घटक रक्तात मिसळतात. रक्तातील पेशी त्यावर रिअॅक्शन दाखवून जंतूंचा नायनाट करतात.
दैनंदिन जीवनात प्रतिकारशक्ती ही दिवसेंदिवस कमी झालेली दिसते. बदलते वातावरण, अपूर्ण आहार, कमी झोप आणि व्यायामाचा अभाव यामुळे जंतूसंसर्ग जास्त जाणवतो. अपूर्ण ज्ञान, अस्वच्छ राहणीमान, गर्दीच्या ठिकाणाचं वास्तव्य यामुळे आजारांत वाढ होत आहे.
प्रतिकारशक्ती कशी वाढवावी ?
याचं सोपे उत्तर म्हणजे नैसर्गिक जीवन जगणं. नुसतंच काम न करता संपूर्ण पौष्टिक आहार, यात फळ आणि पालेभाज्यांचा समावेश असावा. रोज एक फळ खाणं आवश्यक आहे. आहारामध्ये जंकफूड असलं तरी परंतु,आठवड्यातून अगदी एक किंवा दोन वेळाच. आहाराची वेळ निश्चित असावी.
झोपः

२४ तासात कमीतकमी आठ तास झोप आवश्यक आहे. यात शरीराची झालेली झीज भरून निघते. तसेच मेटाबॉलिझम (चयापचय क्रिया) साधारण राहतो. अपुऱ्या झोपेमुळे हृदयासह मेंदूवर जास्त दुष्परिणाम दिसून येतात.
वजनः
जन्मतः उंचीनुसार वजनाचं प्रयोजन असतं. परंतु, स्थूलपणामुळे सगळे अवयव क्षमतेपेक्षा जास्त काम करत असतात. याकरीता नियमित आहार आणि मर्यादित अन्न खाणं गरजेचं असतं.
व्यायामः
खाऊन आलेली ऊर्जा खर्च करणं हे गरजेचं असतं. म्हणूनच २४ तासात एक तास व्यायाम करणं अत्यंत गरजेचं असतं. शरीराचा समतोल साधण्यासाठी प्रतिकारशक्ती गरजेची आहे. आधुनिक काळात नवीन नवीन येणाऱ्या जंतूंचा प्रतिकार करण्यासाठी औषधं, उपचारांपेक्षा नैसर्गिकरित्या आजार टाळता आले पाहिजेत. हाच खरा मोठा उपाय आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये.

EARN ONLINE WIH COPY PASTE JOB : NO REFFERRAL WITHOUT INVESTMENT

 HELLO FRIENDS,        After so much research for online earning website and without specially without investment and without referral ...